
मुंबई- भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी आज अखेर प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान गौरव केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून गावितांची हकालपट्टी करण्यात आली होती.
अखेर ‘भाजप’मध्ये विजयकुमार गावितांचा प्रवेश
दरम्यान नंदूरबार लोकसभा मतदार संघातून गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांनी निवडणूक लढवून माणिकराव ठाकरे यांचा पराभव केल्यानंतर स्वत: विजयकुमार गावित यांनीही महायुतीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. आघाडीच्या धर्माचे पालन न केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने गावितांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
नंदूरबार मतदार संघात भाजपाचे वर्चस्व वाढत गेले तर आघाडीचा जोर कमी झाला. मात्र आता गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नंदूरबारमधील आघाडी सरकारचे अस्तित्त्व संपूष्टात आल्या सारखेच आहे. तर त्या उलट भाजपचे या भागात यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी पोषक वातावरण झाले आहे.


