अमित शहांच्या उपस्थितीत दिग्गजांचे पक्षांतर

amit-shah5
मुंबई – मुंबई दौ-यावर असलेले भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा भेटीसाठी आज रात्री साडेनऊ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे विधान परिषदेचे पक्षनेते विनोत तावडे यांनी सांगितले. मुंबईत अमित शहा येत असल्याने ते उद्धव ठाकरेंना भेटणार की नाही यावरून मिडियात जोरदार चर्चा सुरु होती. उद्धव ठाकरेंनी अमित शहांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले होते त्यानुसार शहा यांनी हे निमत्रंण स्वीकारले आहे. दरम्यान, अमित शहा यांनी चारच्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली.

त्यानंतर, अमित शहांनी विनोद तावडेंच्या निवासस्थानी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर तावडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहांनी उद्धव ठाकरेंचे निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले.

amit-shah4

राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सुर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते, माधव किन्हाळकर, माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर या बड्या नेत्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दत्ताभाऊ प्राथीवकर, अजयसिंग बिसेन यांनीही भाजपात प्रवेश केला.

Leave a Comment