
नागपूर : शहरातल्या गजबजलेल्या छाप्रू नगर परिसरातल्या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या एका आठ वर्षीय मुलाचे अपहरण आणि हत्या घडवून आणल्याची घटना उघडकीस आल्यामुळे, या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूड भावनेने चिमुरड्याचे अपहरण करून हत्या
शहरातले नामवंत दंत चिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांच्या युग या आठ वर्षीय मुलाचे अपहरण केल्यानंतर हत्या केल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्याच्या खापरखेडा परिसरात युगचा मृतदेह आढळून आला असून अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी राजेश सारवे आणि अरविंद सिंह या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींनी आपल्या कृत्याची कबुलीही दिली आहे.
आरोपींपैकी राजेश सारवे डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमध्ये आधी काम करत होता. कामा दरम्यान झालेल्या वादातूनच त्याने सूड घ्यायचे ठरवले. त्यातूनच दोन्ही आरोपींना युगला दुचाकीवर बसवले आणि त्याला क्लोरोफॉर्म देत त्याला ठार मारले.
