राजू शेट्टी, आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

mahayuti
मुंबई: रामदास आठवले यांची आरपीआय जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असून विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयने दिला आहे.

याबाबतची भूमिका रिपब्लिकन पक्ष पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्यामुळे महायुतीत जागावाटपाचा वाद टोकाला गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नसतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टींनी महायुतीतील घटक पक्षांकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा दिला आहे.

आज आघाडी विरोधात लढतो आहे, उद्या युतीच्या विरोधातही लढू अशी टोकाची भाषा खेड तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात बोलतांना दिला आहे.

Leave a Comment