१० सप्टेंबरचा मनसेच्या ‘ब्लू प्रिंट’ची मुहूर्तवेढ

mnse
मुंबई : गणेशोत्सवानंतर १० सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या जवळपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहाततब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लू प्रिंट सादर केली जाणार आहे. या ब्लू प्रिंटचे किमान अडीच तासांचे सादरीकरण केले जाणार असून विविध विकास योजनांकरिता निधी उभारणीचे मार्ग त्यामध्ये सुचवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करण्याची घोषणा केली होती. मात्र, या ब्लू प्रिंटची फक्त चर्चा सुरू होती. ती प्रत्यक्षात कधी सादर करणार याकडे मनसे कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील जनतेचेही डोळे लागले हेते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने ‘व्हिजन डॉक्यमुमेंट’ सादर करून मनसेवर कुरघोडी केली होती.

दरम्यान, मनसेच्या ब्लू प्रिंटला 10 सप्टेंबरचा मुहूर्त लाभला आहे. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात पक्षाध्यक्ष राज ठाकरे ही ब्लू प्रिंट सादर करणार आहेत.

Leave a Comment