७१ मराठी सिने तारे-तारकांचा दगडूशेठ हलवाई गणपतीला महाअभिषेक

pune2
पुणे – सलाम पुणे ‘ संस्थेतर्फे आयोजित विश्वशांती आणि समृद्धीसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ७१ मराठी सिने तारे-तारकांनी महाअभिषेक आणि महाआरती केली. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया ‘ चा एकच जयघोष कलावंतांनी केला. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात ७१ कलावंतांनी एकत्रित महाआरती करण्याचा हा पहिलाच प्रसंग आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर२०१४ रोजी नोंदविला गेला आहे.

pune

यावेळी अभिनेता पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, पुष्कर जोग, सचिन खेडेकर, विनीत शर्मा, गुड्डू धनवाणी, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, कांचन अधिकारी, तसेच दक्षिणेची प्रसिध्द अभिनेत्री डिम्पल चोपडे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, ज्योती चांदेकर, जयमाला काळे, सुहासिनी देशपांडे, गौरी गाडगीळ अभिनेता संग्राम साळवी आणि भूषण कडू, देवेंद्र भगत, सचिन गवळी , जॉनी रावत, अभिनेत्री पूजा पवार, प्रीतम कांगणे, हीना पांचाळ, प्रतीक्षा जाधव, वृंदा बाळ, गौरी कोंगे, मोहिनी कुलकर्णी ,मिथीला नाईक, सोनिया बर्वे, निखिल वैरागर, तसेच अश्विनी दरेकर विजय कोंडके, मेघराजराजे भोसले, निलेश नवलाखा, विशाल गवारे, मोहन दामले, माछिंद्र धुमाळ, अजय नाईक, निखिल महामुनी, हर्षित अभिराज, आशिष केसकर, सुनील वाईकर,अमोल कांगणे, सुनील महाजन, निकिता मोघे, संतोष चोरडिया, मयुर लोणकर, सुवदन आंग्रे, कुमार डोंगरे, दीपक सवाखंडे, योगेश वनवे, हेमंत वनारसे, वैभव पगारे, संग्राम सरदेशमुख, प्रियांका यादव, गौतमी देवस्थळी, कौस्तुभ कुलकर्णी, दत्तात्रय हिंगणे, प्रदीप लडकत, नितीन जाधव, योगेश जोरे आदी एकून ७१ कलावंत या उपक्रमात सहभागी झाले होते. सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर तसेच निलेश तरवडे आणि महेश आणि मंगेश सूर्यवंशी, रवि सहाने यांनी कलावंतांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे नियोजन केले.

pune

Leave a Comment