
टोकियो : दोन्ही देशांमधील सामरिक क्षेत्रातील संबंध वाढविण्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे समकक्ष शिंजो आबे यांच्यात शिक्कामोर्तब करण्यात आले असून जपानने दोन्ही देशात जल आणि वायू विमान ‘यूएस-2’ ची विक्री आणि हे युद्ध विमान बनविण्यासाठी लागणारे साहित्य भारताला हस्तांतरीत करण्यावर सहमती दर्शवली आहे. जपानकडून प्रथमच दुस-या महायुद्धानंतर भारताला सैन्य सामग्रीची विक्री करणार आहे.
जपान प्रथमच भारताला सैन्य सामग्री विकणार
मोदी यांच्या जपान दौ-यात झालेल्या दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांमध्ये शिखरवार्ता झाली. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जपान भारताला वित्तीय, औद्योगिक आणि बुलेट ट्रेनच्या संचालनात मदत करेल असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले.
