२७ हजारी झाला सेंसेक्स

share-market
मुंबई – शेअर बाजारात तेजी कायम असून सेंसेक्स आणि निफ्टीने मंगळवारी ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.

सलग आठव्या सत्रात सेंसेक्सने २७००० अंकांचा टप्पा ओलांडला आहे तर निफ्टीने ८१०० अंकांचा टप्पा पार करून ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून तेजी कायम असल्याने गुंतवणुकदारांना अच्छे दिनाचा प्रत्यय आला आहे.

एक्साइड इंडस्ट्रीज, मारुती, श्रीराम ट्रान्सपोर्ट, सेंच्युरी टेक्सटाइल्स, अपोलो टायर आणि टीएफसीआयमध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा उचलण्याची नामी संधी चालून आल्याचे बाजार विशेषज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment