माजी सनदी अधिकारी आठवलेंच्या रिपाईत

uttam-khobragade
मुंबई – मंगळवारी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना मुंबईतून विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासकीय सेवेत राजकारण्यांशी संघर्ष करणाऱ्या उत्तम खोब्रागडे यांना सेवानिवृत्तीनंतर राजकारणाचे वेध लागले होते व त्यांच्या भूमिकेविषयी सर्वांनाच कमालीची उत्सुकता होती. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंच्या उपस्थितीत उत्तम खोब्रागडे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. दलितांच्या विकासासाठी रिपाईचा हाच योग्य पर्याय असल्याने या पक्षात प्रवेश केल्याचे खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खोब्रागडे यांनी आजपर्यंत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, बेस्टचे महाव्यवस्थापक, आदिवासी खात्याचे प्रधान सचिव अशी पदे भूषविली असून त्यांची आदर्श घोटाळ्यात भूमिका वादग्रस्त ठरली होती.

Leave a Comment