पिंक पँथर्स पहिल्या प्रो-कब्बडी लीगचे विजेते

pink-panther
मुंबई – जयपूर पिंक पँथर्सने यू मुंबाचा पराभव करुन पहिल्यावहिल्या प्रो-कब्बडी लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रविवारी मुंबईतील वरळी इथल्या एनएससीआयच्या सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात जयपूरने मुंबावर ३५-२४ असा विजय मिळवला.

pink-panther1

गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या जयपूरने पाटणा पायरेट्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर यू मुंब्राने बंगळूरू बुल्सवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेतील कामगिरीचा विचार करता अंतिम सामन्यात दोन्ही संघांची बलस्थाने जवळपास सारखीच होती. विशेष म्हणजे दोन्ही संघा दरम्यान या स्टेडियममध्ये सलामीचा सामना झाला होता. त्यात यू मुंब्राने विजय मिळवला होता. मात्र अंतिम फेरीत त्यांना तशी कामगिरी करता आली नाही.

Leave a Comment