
क्योटो: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौऱ्याचा तिसरा दिवस असून मोदींनी या 3 दिवसात अनेक महत्वाच्या विषयांना हात घातला. टोकियोतले मोदींचे राष्ट्रभाषेतील भाषण या दौऱ्यातील सर्वात मोठे वैशिष्टय् ठरले.
जपानमध्ये मोदींनी केले राष्ट्रभाषेत भाषण
नरेंद्र मोदींनी जपानी उद्योगपतींसमोर हिंदीतून भाषण केले. मोदींनी यावेळी जपानी उद्योगपतींचे विशेष कौतुक केले. ३० वर्षानंतर भारतात बहुमताचे सरकार आल्याने जबाबदारी वाढल्याचेही यावेळी मोदींनी नमूद केले.
यावेळी पंतप्रधानांनी कौशल्यपूर्ण रोजगानिर्मितीवर विशेष भर देण्याची गरज बोलून दाखवली. यासाठी पंतप्रधानांनी जपानची मदत मागितली आहे.
