राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहणार – पंकजा मुंडे

pankaja
नांदेड : आपण राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहणार असून जर का महिन्यापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक झाली असती तर, आपण निवडणूक लढविली असती असे सांगितल्यामुळे पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज पंकजा मुंडे संघर्ष यात्रेनिमित्त नांदेड येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी ही माहिती दिली. आपण मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर त्यांच्या वारस म्हणून त्यांच्या कन्या पंकजा यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, पंकजा यांनी लोकसभा न लढविण्याचे संकेत दिल्याने या जागेवर भाजपाकडून कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment