१५ जणांना अर्जुन पुरस्कार

arjun-purskar
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रतिभावंत १५ खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार आणि पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्काराने आणि तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन्मानित केले, पण यावर्षी कोणत्याही खेळाडूला देशातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.

हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी, तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफीही प्रदान केली गेली.

अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद आणि तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कारांमध्ये ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि पाच लाख रुपयांची राशी दिली गेली आहे. तर राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारात ट्रॉफी प्रदान केली गेली. अब्दुल कलाम आझाद ट्रॉफीसाठी ट्रॉफीसोबतच दहा लाख रुपये प्रदान करण्यात आले.

Leave a Comment