महिलेवर बलात्कार करून खून, मृतदेह झाडाला टांगला

rape
औरंगाबाद – बेगमपुरा भागातील आसारामबापू आश्रम परिसरात शेळ्या चारणाऱ्या ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून खून केल्यानंतर तिच्या साडीने मृतदेह झाडाला लटकवण्यात आला.

गुरुवारी बेगमपुरा भागातील गायरानात बकऱ्या चारण्यासाठी मिटमिटा येथील अमिनाबी शेख मुस्ताक ही गेली होती. सायंकाळी बकऱ्या घरी परतल्या. मात्र, अमिनाबी आली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यात आला. शेवटी शेख मुस्ताक यांनी छावणी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. शुक्रवारी आसारामबापू आश्रमाजवळ अमिनाबीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला

या खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त रामराव हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, गौतम फसले, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश दांडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अमिनाबीचा मृतदेह ओढत झाडाखाली नेण्यात आल्याच्या खुणा जमिनीवर दिसत होत्या.

Leave a Comment