उर्वरीत सामन्यांना मुकणार रोहित

rohit-sharma
नॉटिंगहॅम – इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत तीन एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्याला भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा मुकणार असून त्याच्या हाताच्या बोटांना फॅक्चर झाल्याने तो यापुढील सामने खेळू शकणार नाही. रोहितच्या बदली संघात मुरली विजयचा समावेश करण्यात आला आहे.

मुरली विजयने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने दहा डावात एक शतक आणि दोन अर्धशतके केली होती.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालेकत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुस-या सामन्यात भारताने १३३ धावांनी विजय मिळवला होता. कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर भारताने मालिकाच ३-१ अशी गमावली होती. आता मात्र ढोणी आणि त्याच्या सहका-यांना वनडे विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघा दरम्यानचा तिसरा सामना आज होणार आहे.

Leave a Comment