औरंगाबादमध्ये राम गोपाल वर्मा विरोधात गुन्हा दाखल

ramu
औरंगाबाद : क्रांती चौक पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री प्रख्यात दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या वादग्रस्त ट्विट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राम गोपाल वर्मा यांनी शुक्रवारी ‘जो देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही. तो इतरांचे रक्षण काय करणार’, असे ट्विट केले. त्यानंतर समाजातील विविध स्तरांतून यावर टीका करण्यात आली. अनेक ठिकाणी राम गोपाल वर्मा यांचा निषेध करण्यात आला. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने वर्मा हे या ट्विटमुळे वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. त्यामुळे या मजुकरावर आक्षेप घेत समर्थनगर येथील अमित कुमार शहाजी भांगे या व्यापाऱयाने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गोवर्धन कुळेकर पुढील तपास करीत आहे.

Leave a Comment