ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅबॉट भारत दौऱ्यावर

tony
सिडनी- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट हे पुढच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. व्यापाराबरोबरच अन्य क्षेत्रातही दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. ४ ते ६ सप्टेंबर या काळात अॅबॉट भारत आणि मलेशिया या देशांना भेटी देणार आहेत.

पंतप्रधान झाल्यानंतर अॅबॉट यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारत भेटीत ते राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींनाही ते भेटणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्यात बाजार मोठा असून दोन्ही देशात विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रात सहयोग वाढण्यासंबंधी चर्चा या दौऱ्यात केली जाणार आहे.

Leave a Comment