जाडी कमी करायचीय? मग मेट्रोतून प्रवास करा

metro
लंडन – वाढणारे वजन ही जगातली मोठी समस्या बनू पाहते आहे. लहान वयापासून हा वजनवाढीचा प्रॉब्लेम अनेक देशांना व्यापून राहिला आहे. जाड लोक वजन कमी करण्यासाठी आपल्यापरिने अनेक उपाय करत असतात. मात्र आता वजन कमी करण्याचा सोपा उपाय लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅन्ड ट्रोपिकल मेडिसिन आणि लंडन कॉलेज विद्यापीठातील संशोधकांनी शोधला आहे.

या संशोधकांच्या म्हणण्यानुसार कामावर जाताना स्वतःच्या वाहनातून जाण्यापेक्षा मेट्रो, बस अशा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणार्‍यांमध्ये वजन वाढीची शक्यता कमी असल्याचे आढळले आहे. बॉडी मास इंडेक्स आणि पर्सेटेज बॉडी फॅट यांचा संबंध शोधण्यासाठी हे संशोधन केले गेले आहे. त्यात असे आढळले की पायी चालणे, सायकल चालविणे आणि सार्वजनिक वाहनांचा उपयोग प्रवासासाठी करणे हे आरोग्यासाठी अधिक चांगले आहे. यामुळे वजनवाढीची समस्या उद्भविण्याची शक्यता अनेक पटींनी कमी होते.

लंडनमध्ये ७६ टक्के पुरूष, ७२ टक्के महिला स्वतःच्या वाहनांचा वापर करून कामावर जातात तर केवळ १० टक्के पुरूष आणि ११ टक्के महिला कामावर अथवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment