
पॅरिस – ९ वर्षे एकत्र राहिल्यावर अखेर हॉलिवूडचा अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजलिना जोली अखेर विवाहबंधनात अडकले असून दोघेही फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले. त्यांच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला. या लग्नात त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र सहभागी झाल्याचे समजते.
ब्रॅड पिट व अँजेलिना जोली झाले विवाहबद्ध
पिट व जोली यांनी प्रथम कॅलिफोर्निया येथून जजकडन लग्नाचे प्रमाणपत्र घेतले व त्यानंतर फ्रान्समधील शानदार विवाहसोहळ्यात ते लग्नगाठीत अडकले. या सोहळ्यास त्यांची सहा मुलेही उपस्थित होती.
ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने २००० साली अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टशनी लग्न केले होते, मात्र २००५ साली ते विभक्त झाले. तर अँजलिना जोलीचे हे तिसरे लग्न आहे.
