मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरी बाप्पा विराजमान

cm

मुंबई – आज गणेश चतुर्थी. आज देश-विदेशात गणेशोत्सवाची धूम दिसून येत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही गणेशोत्सवात उत्साहाने भाग घेतला आहे.

ट्विटरवरून तमाम मराठी जनतेला शुभेच्छा देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की गणपती बाप्पा मोरया! श्रीगणेशाचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो व महाराष्ट्र संपन्न होवो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

Leave a Comment