राज्य सरकारचे माळीणच्या पुर्नवसनासाठी ७ कोटी

mallin
पुणे : गुरूवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत माळीण गाव दुर्घटनेच्या पुर्नवसनासाठी ७ कोटी रूपये खर्च करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला.

माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रचंड प्रमाणात जीवितहानी आणि प्राणहानीही झाली. पुण्याचे जिह्याधिकारी सौरभ राव यांनी माळीण दुर्घटनेबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडला होता. ३० कुटुंबीयांना तात्पुरते शेडचे घर बांधण्यासाठी प्रत्येकी एक लाख रूपये खर्च करावा, ७२ कुटुंबीयांना पक्के घर बांधण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रूपये, प्रति एकर चार लाखाने आठ एकर जमिनीची खरेदी आणि नागरी सुविधांसाठी ५ लाख रूपये खर्च करण्यात यावा, असे या प्रस्तावात नमूद केलेले आहे.

यासोबतच गावात स्मृती भवन, स्मृती स्तंभ, कुंपणाची भिंत आणि समाज मंदीरे बांधण्यासाठी १ कोटी रूपयांचा खर्च अदिवासी विकाम विभागाकडून देण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार ही कामे एका वर्षाच्या आत पूर्ण होणार आहेत.

Leave a Comment