निवडणुकीच्या गोंधळामुळे बदलणार शालेय परीक्षांचे वेळापत्रक ?

exam
मुंबई : विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या गोंधळामुळे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या ३ ते २३ ऑक्टोबर दरम्य़ान राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण याच दरम्यान मुंबई आणि परिसरातील शाळा-कॉलेजांच्या सहामाही परीक्षा घेतल्या जातात.

७ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या बहुतांश शाळा-कॉलेजांमध्ये सहामाही परीक्षा घेण्यात येणार असून याच दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यास शाळा-कॉलेजातील शिक्षकांना निवडणुकीची काम लावण्यात येतील, त्यामुळे शाळा-कॉलेजांच्या सहामाही परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शाळा-कॉलेजांनी ऐनवेळेला वेळापत्रकात बदल करावे लागत असल्याने या निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment