
कल्याण : इराक मधील ‘आयएसआयएस’या दहशतवादी संघटनेमध्ये सामील झालेल्या कल्याणचा रहिवाशी असलेल्या आरिफ मजिद या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली असून कल्याण येथील चार युवक इराक येथील ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यापैकी आरिफ मजिद नावाच्या एका युवकाचा इराक़ येथे मृत्यू झाल्याचे इराकमधल्या एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.
‘आयएसआयएस’मध्ये सामील झालेल्या तरुणाचा मृत्यू
तिथे आरिफ मजिद याने एका पॅलेस्टाईन मुलीबरोबर लग्न केले आणि त्यानंतर तो लढाई करता गेला असता त्याचा मृत्यू झाल्याचे संकेतस्थळाने प्रसिद्ध केले असून या वृत्ताबाबत कल्याण पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
२३ मे रोजी हा युवक त्याच्या चार साथीदारांसह इराकला रवाना झाला होता. २५ मे रोजी चार युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी दिली होती आणि २७ मे या दिवशी या चार युवकांनी आपल्या पालकांशी संपर्क केला होता. आणि त्यानंतर तपास यंत्रणांनी या चार युवकांना फरार घोषित केले होते.
