यादव यांच्यावर गरजेची आहे हृदय शस्त्रक्रिया

lalu-prasad
मुंबई – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे आज मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले असून यासंदर्भातील काही अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतरच शस्त्रक्रियेबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे एशियन हार्ट रुग्णालयातील चिकित्सक डॉ. विजय डी सिल्वा यांनी सांगितले.

रविवारी रात्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Leave a Comment