पीएफवरील व्याजदरात कोणताही बदल नाही

epfo
नवी दिल्ली – भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणताही बदल न करता ईपीएफओने २०१४-१५ साठी ८.७५ टक्के इतका कायम ठेवला आहे.

केंद्रीय निर्वाह निधी आयुक्त के. जलान यांनी चालू आर्थिक वर्षात ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.७५ टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची सर्वोच्च संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज(सीबीटी)च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जलान म्हणाले. इपीएफकडे देशभरातील पाच कोटी लोकांची खाती आहेत. २०१३-१४ मध्ये भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.७५ टक्के इतका होता. तर त्यापूर्वी २०१२-१३ मध्ये हा दर ८.५ टक्के इतका होता.

Leave a Comment