अमेरिकन ओपन स्पर्धेत जाकोविच, शारापोवाची विजयी सलामी

tennis
न्यूयॉर्क – वर्षाच्या अखेरच्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत माजी चॅम्पियन आणि सार्बियाचा प्रसिध्द टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि रशियाच्या मारिया शारापोवा यांनी विजयी सलामी दिली आहे.

या दोघांनी पुरूष आणि महिला एकेरीमध्ये विजय संपादन केला आहे. आर्थर एश स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सामन्यात पुरूष गटात सार्बियाच्या नोवाक जोकोविचने पहिल्या राऊंडमध्ये अर्जेंटिनाच्या डिएगो स्काऊटजमॅनला सलग सेटमध्ये ६-१, ६-२, ६-४ अशी मात केली. महिला गटात रशियाच्या मारिया शारापोवा हिने पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याच देशाच्या मारिया किरीलेंकोचा ६-४, ६-० असा पराभव केला.

Leave a Comment