
मुंबई – राज्य गृहमंत्रालयाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे पारसकरांना निलंबित करण्याची शिफारस
पारसकर यांच्यावर एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून तक्रारदार महिलेची वागणूक आणि तिने पारसकरांना पाठवलेले ई मेल आदी तपासून पारसकरांना न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
पीडित मॉडेलने पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे २५ जुलै रोजी मढ येथील एका थ्री-स्टार हॉटेलमध्ये पारसकर (५७) यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तिने दाखल केलेल्या तक्रारीत पारसकर यांनी तिचे दोन वेळा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
