४८ तासात सोडा पंतप्रधानपद

nawaj
इस्लामाबाद – नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद सोडण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टीमेटम’ मौलाना ताहिर-उल-कादरी यांनी दिला असून कादरी आणि पाकिस्तानातील तहरिक-ए-इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनने सत्ता मिळविली होती. दरम्यान, या निवडणुकीतील निकालावर निवडणुक अधिका-यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून निवडणुकीची प्रक्रिया, निकाल आणि सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रिया घटनाबाहय असल्याचा आरोप या अधिका-यांनी केल्यामुळे इम्रान खान आणि मौलाना ताहिर-उल-कादरी यांनी पंतप्रधान शरीफ यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

पाकिस्तान संसद भवनाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कादरी यांनी शरीफ सरकारला सत्ता सोडण्यासाठी 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे.

Leave a Comment