
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणूकाची घटिका जसजशी जवळ येऊ लागली असताना सेना, भाजपमध्ये आयारामांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते, आजी, माजी आमदार, माजी मंत्र्यांनतर आता मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सोडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुजबळ यांना प्रकाश सुर्वे देणार धक्का!
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे शिवसनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेण्याची शक्यता आहे. प्रकाश सुर्वे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
मागील काही दिवसांपासून प्रकाश सुर्वे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्यामुळेच ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
प्रकाश सुर्वे यांच्यासह राष्ट्रवादीचे आणखी दोन नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. ही पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
