मुंबईतील पहिल्या भूमिगत आणि तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे आज उद्घाटन

metro
मुंबई- मुंबईतील मरोळ येथील अंधेरी-घाटकोपर रोडवर अग्निशमन केंद्राजवळ आज दुपारी तीन वाजता मुंबईतील तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे व कुलाबा-वांद्रे- अंधेरी (सीप्झ) या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमीपूजन होत असून या प्रकल्पासाठी २३ हजार १३६ कोटी रूपये खर्च येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते व केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मेट्रोचे काम सुरु आहे. यात केंद्र व राज्य सरकारचे अर्थसहाय्य आहे. यात मेट्रो-१ व मेट्रो-२ चे काम सुरु आहे. मुंबई मेट्रो-१ ची सेवा सुरु झाली आहे. याचबरोबर मेट्रो-३ चे आज भूमिपूजन होत आहे. मेट्रो-३ हा प्रकल्प संपूर्णपणे भूमिगत असून, या मार्गावर २७ स्थानके असतील. एकून ३२.५ किमी लांबीचा हा भूमिगत मार्ग असेल. हा मार्गावरील मेट्रो ही अद्यावत व वातानुकूलित सेवा-सुविधा उपलब्ध असतील. हा प्रकल्प ७ वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment