भाजप महाराष्ट्र प्रभारीपदी ओम माथूरांची वर्णी !

om-mathur
मुंबई – भाजपने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी खासदार ओम माथूर यांची नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली असून माथूर हे राजस्थानचे असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे मोदी-शहा जोडगळीने सध्याचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी यांना हटवले आहे.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना माथूर हे गुजराजतचे प्रभारी होते व त्याकाळापासून मोदी-शहांचे माथूर यांच्याशी सख्य होते. कुख्यात सोहराबुद्दीन बनावट पोलिस चकमक प्रकरणी माथूर यांचे नावही पुढे आले होते. असे असले तरी माथूर हे अभ्यासू, चाणाक्ष व आक्रमक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांची मोदींशी नाळ जुळली. आता याच त्यांच्या कर्तबगारीमुळे मोदींनी त्यांच्याकडे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारीपद सोपवले आहे.

Leave a Comment