ऑस्ट्रेलियाने उडविला झिम्बाब्वेचा धुव्वा

austraila
हरारे : ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर त्रिकोणीय क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेचा १८९ धावांनी धुव्वा उडविला.

त्रिकोणीय क्रिकेट लढतींच्या मालिकेतील ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करीत झिम्बाब्वे विरूध्द ५० षटकांमध्ये सहा गडयांच्या मोबदल्यात ३५० धावा काढल्या. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल याने ९३ आणि मिचेल मार्श याने ८९ धावा केल्या. झिंबाब्वेचा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टकली. झिम्बाब्वेला ३९.३ षटकात अवघ्या १५२ धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियन संघाने रोमहर्षक विजयाची नोंद केली.

Leave a Comment