सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण- सहकारमंत्री

harshwardhan
पुणे : राज्यातील सुमारे दीड लाख सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील तयारी पूर्ण झाली असून निवडणुका लवकरात लवकर घेतल्या जातील, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली.

सहकार विभागातील अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आज येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरण स्थापण्यात आले आहे. त्याबाबतची प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात येतील. निवडणुका घ्यावयाच्या सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणानुसार संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्राधिकरण निश्चित करण्यात येईल.

राज्य शासनाने सन 2014-15 वर्षासाठी 40 हजार कोटी रुपयांचा पतआराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी 5136 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वितरण झाले आहे. हे एकूण पीक कर्जापैकी 57 टक्के कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत तर 43 टक्के कर्ज सहकारी बँकांमार्फत वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साखर कारखान्यांचे गळित हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होतील. यंदाच्या हंगामात 102 सहकारी तर 60 खासगी सहकारी कारखान्यांचे हंगाम सुरू होतील. मात्र यंदा साखरेच्या उत्पादनात 15 टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment