शिओमी रेडिमी वन एस २६ ऑगस्टला भारतात

xiomi
चीनी स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या शिओमी एम आय ३ च्या प्रचंड यशानंतर आपला दुसरा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन रेडिमी वन एस भारतात लाँच करण्यात येत असल्याची घोषणा केली असून हा फोन २६ ऑगस्टला लाँच केला जात आहे. या फोनची किमत ६९९९ रूपये असून तो याच किमतीत उपलब्ध असलेल्या मोटोरोला मोटो ई बरोबर स्पर्धा करू शकणार आहे.

या स्मार्टफोनचे लॉचिंग २६ ऑगस्टला केले जात असले तरी याच दिवशीपासून तो विक्रीसाठीही उपलब्ध होणार का याचा खुलासा कंपनीने अद्यापी केलेला नाही. ४.७ इंची स्क्रीन, अॅड्राईड ४.३ जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरनल मेमरी १६ जीबी, ६४ जीबी पर्यंत ती वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा रिअर कॅमेरा व १.६ चा फ्रंट कॅमेरा अशी त्याची वैशिष्ट्ये असून हा स्मार्टफोनही भारतात हॉट स्मार्टफोन ठरेल असा जाणकारांचा अंदाज आहे.

Leave a Comment