विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार नाही- राज ठाकरे

raj2
नागपूर – महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुक रिंगणात आपण उतरणार नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपुरात रविवारी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उतरणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी मे महिन्यात केली होती. राज्यात आक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

नागपूरात मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची मनीषा असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राज आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आमच्या आजोबांपासून सर्व ठाकरे घराण्याने महाराष्ट्र हाच मतदारसंघ मानला आहे. त्यामुळे नककी कोणता मतदारसंघ निवडायचा असा प्रश्न आहे. मुबंईतून निवडणूक लढवायची तर मग विदर्भातून का नको असा सवाल मनात येतो. यामुळे निवडणूक न लढविण्याचाच निर्णय घेतला आहे.

वेगळ्या विदर्भाला माझा पाठींबा नाही असे सांगताना ते म्हणाले आमचे दैवत शिवाजी राजे महाराष्ट्रात जन्मले तर त्यांच्या मातोश्री जिजाबाई विदर्भातल्या आहेत. विदर्भ वेगळा काढून आईलेकराची ताटातूट कशी करता येईल? हा प्रश्न केवळ तत्त्वाचा नसून भावनिक आहे.

Leave a Comment