सुरत हिरे निर्यात सेझ केंद्र होणार

surat
सुरत- देशातील हिरे व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले गुजराथमधील सुरतेत फक्त हिरे निर्यात व्यवसायासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्माण केले जाणार आहेत. अशा प्रकारचे देशातील हे पहिलेच केंद्र असेल असेही समजते. या हिरे हबसाठी सेझ जागा निश्चित करण्यात आली असून येत्या १-२ महिैन्यात सेझ स्थापन केले जाईल असे गुजराथचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांनी सांगितले. सुरत येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याबाबत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याशी बोलणी झाली असून येथून दुबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याबाबतही विचार केला जात आहे असेही ते म्हणाले.

सुरत येथे सेझ स्थापन झाल्यानंतर येथील हिरे आणि दागिने निर्यातदाराना हिरे थेट येथेच आणून त्यावर प्रोसिसिंग करणे सुलभ होणार आहे. या सेझ साठी हिरे पॉलीशर आग्रही आहेत. येथे पॉलिश केलेले हिरे अॅंटवर्प, दुबई व अन्य देशात निर्यात केले जातात. गुजराथेत एकूण १८ सेझ आहेत मात्र केवळ हिरे निर्यातीसाठी असे एकही सेझ नाही. भारतातून होत असलेल्या एकूण निर्यातीत हिरे आणि अन्य मौल्यवान खडे यांच्या निर्यातीचा वाटा १५ टक्के आहे असेही समजते. एप्रिल ते जून २०१४ या काळात ७.५ अब्ज डॉलर्सची हिरे निर्यात येथून झाली आहे.

Leave a Comment