मुंडेंच्या श्रीमुखात लगावल्याने सोमय्यांविरोधात गुन्हा

kirit-somaiya
मुंबई – मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या एका पोलिस निरीक्षकाच्या श्रीमुखात लगावली होती.

किरीट सोमय्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलीस निरिक्षक संपत मुंडे यांनी दाखल केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांच्यावर भारतीय दंड संहीता कलम ३३२, ३५३ आणि ५०६ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचा-याला मारहाण करणे हा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

परूक्षीत ढुमे या भाजप कार्यकर्त्याविरोधात लोकसभा निवडणुकांच्या वेळी तक्रार दाखल झाल्यामुळे २१ ऑगस्ट रोजी ढुमे यांला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, त्याला सोडवण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी पोलिस निरिक्षक संपत मुंडे यांना धक्काबुक्की केली तसेच श्रीमुखात लगावल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

Leave a Comment