रिचर्डसन वेस्ट इंडीजचे अंतरिम प्रशिक्षक

richardson
गुयाना : बांग्लादेश विरूध्दच्या सामन्यासाठी रिची रिचर्डसन अंतरिम प्रशिक्षक म्हणून पदभार सांभाळणार असून ओटीस गिब्सन यांनी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिची रिचर्डसन यांची निवड करण्यात आली आहे.

दोघांमधील करार वेस्ट इंडीज संघ आणि गिब्सन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०१०मध्ये गिब्सन यांनी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. २०१२ मध्ये वेस्ट इंडीज संघाने टी-२० विश्वचषक गिब्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या कसोटी सामन्यातील संघाची कामगिरी अतिशय खराब होती.

Leave a Comment