गुहागरमधून निवडणूक लढविणार नाही निलेश राणे

nilesh-rane
मुंबई- काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. माझा कोणत्याही पक्षाला विरोध नव्हता आणि रहाणार ही नाही, पण अप्रत्यक्षरित्या भास्कर जाधवांच्याविरोधात काम करणार असल्याचे जाहीर केले.

आज दुपारी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी याबाबतची माहिती दिली असून मी माझा आपला निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेत आहोत. राणेंसाहेबांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आमचे लक्ष्य भाजप-शिवसेनेला पराभूत करण्याचे असल्याने हा निर्णय घेत आहे. राणेंसाहेबांना आघाडीत बिघाडी होऊ नये असे वाटत आहे. साहेबांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले. आपण कोणत्याही पक्षाविरोधात नाही. राष्ट्रवादीच्या तर अजिबात नाही. मात्र काही व्यक्तींच्याविरोधात आपण संघर्ष करणार आहोत. लोकसभेला आघाडी असताना व भास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या प्रचाराला आले नाहीत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आले मग भास्कर का आले नाहीत? भास्कर जाधव यांच्यामागे कोणाचा तरी हात आहे म्हणूनच ते आपल्या प्रचाराला आले नाहीत. लोकसभेत आपला पराभव होण्यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रातांध्यक्ष असलेले भास्कर जाधव, आमदार दीपक केसरकर, आमदार विजय सावंत यांनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे या लोकांना धडा शिकविल्याशिवाय आपण राहणार नाही असे निलेश राणेंनी सांगितले.

Leave a Comment