फ्लेचर यांची पडणार विकेट , बीसीसीआयने दिले संकेत

fletcher
नवी दिल्ली – बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने विद्यमान इंग्लंड दौरा हा डंकन फ्लेचर यांचा भारतीय संघासोबतच शेवटचा दौरा असेल त्याचबरोबर मायदेशात होणा-या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वीच त्यांच्या गच्छंती केली जाईल, असे म्हटले आहे.

फ्लेचर हे प्रशिक्षक म्हणून सपशेल अपयशी ठरलेत. मुदतवाढ मिळाली तरी त्यांना यापुढे ठेवले जाणार नाही. कदाचित वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारत दौ-यात यजमान संघाचा प्रशिक्षक नवा असेल.

त्याचबरोबर डंकन यांनी पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केल्यास बीसीसीआय त्यांना थांबवणार नसल्याचे या पदाधिका-याने सांगितले. फ्लेचर यांचा करार २०१५ वनडे वर्ल्डकपपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Leave a Comment