राम कदम यांच्याकडून शिवसेना विभागप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी

ram-kadam
मुंबई – शिवसेनेच्या एका विभाग प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील एका आमदाराने दिल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, या आमदाराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हा गुन्हा दाखल झाला आहे तो घाटकोपर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांच्या विरोधात.

घाटकोपर येथील चिराग नगर पोलिस ठाण्यात शिवसेनेचे घाटकोपर विभाग प्रमुख सुधीर मोरे यांना राम कदम यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कलम ५०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

सुधीर मोरे हे त्यांचा पक्षाचा प्रचार करणारी बैठक घेत असताना त्यांना काम कदम यांनी फोन करुन धमकी दिल्याचा आरोप सुधीर मोरे यांनी केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत सुधीर मोरे हे घाटकोपरमधून राम कदम यांच्याविरोधात निवडणुक लढण्याची शक्यता आहे. दहीहंडीच्या सोहळ्यादरम्यान, मोरे आणि राम कदम यांच्यात बाचाबाची झाल्याचेही सजमते.

Leave a Comment