
नगर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रामाणिकपणे करा आणि दर्जाशी कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नसून कामात भ्रष्टाचार करू नका. त्याचप्रमाणे अगर पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याच खड्ड्यांत गाडून बुलडोझर फिरवू असा सज्जड इशारा दिला आहे.
पुन्हा खड्डे पडल्यास त्याच खड्ड्यांत कंत्राटदारांना बुलडोझरने गाडू
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कल्याण-विशाखापट्टणम या 222 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील अणे घाट ते नगर बायपास रस्त्याच्या दुपदरीकरण फेरस्थापना व दर्जा उन्नतीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सोमवारी हा कार्यक्रम झाला. पक्षाचे सरचिटणीस श्याम जाजू, खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले, विजय औटी उपस्थित होते.
कामात पारदर्शकता ठेवा. कंत्राटदार, अधिकारी, वरिष्ठ यंत्रणा यांची नावे व संपर्क क्रमांक याची माहिती कामाच्या ठिकाणी लावा. गैरव्यवहार न करता काम करा, असा इशारा त्यांनी दिला.
