मधुकर पिचड यांनी लपविली जात; चौकशीची मागणी

pichad
मुंबई – नागपूर येथील आदिम संविधान संरक्षण समितीने आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आपली मूळ जात लपवून जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केले असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असून याविरोधात आम्ही लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समितीच्या नंदा पराते यांनी सांगितले.

पिचड हे आदिवासी विकासमंत्री असून त्यांनी स्वत:चाच जास्त विकास केला आहे. त्यांनी हलवा, धनगर, गोवारी या आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले असून आपल्या उच्च पदाचा फायदा उचलत त्यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोपही पराते यांनी केला आहे.

पिचड यांचे वडील देशमुख आडनाव लावत असत आणि त्यांच्या जातीच्या दाखल्यावर कोळी जात नमूद करण्यात आली आहे. असे असताना पिचड यांनी हिंदू महादेव कोळी अशी जातीची नोंद करत जात प्रमाणपत्र घेतले आहे. घटनेनुसार ज्या जातींना आरक्षण दिलेले आहे त्यामध्ये या दोन्ही जातींचा समावेश नाही. घटनेनुसार अनुक्रमांक 29 वर कोळी महादेव जातीचा समावेश असतानाही जात प्रमाणपत्र देणा-या समितीने वेगळी बाब म्हणून हिंदू महादेव कोळी असे जात प्रमाणपत्र देत असल्याचे नमूद करीत जात प्रमाणपत्र दिल्याचेही उघडकीस आले आहे. मधुकर पिचड यांनी शाळा सोडल्याचा दाखला यासाठी दिला. मात्र, त्या दाखल्यावरही हिंदू महादेव कोळी असा उल्लेख आहे.जात वैधता तपासताना मधुकर पिचड यांच्या 1950 पूर्वीच्या कोळी जातीच्या सबळ पुराव्याकडे जात तपासणी समितीने दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे.

1 thought on “मधुकर पिचड यांनी लपविली जात; चौकशीची मागणी”

  1. मधुकर पिचड हे खरेच आदिवासी महादेव कोळी जमातीचे आहेत. यात शंका घेण्याचे कारण नाही. ते राजूर येथे राहणाारे आहेत. त्या गावातील अनेक हिंदू महादेव कोळी हे देशमुख आडनावाचे आहेत. तेथील देशमुखवाडी हे गाव पूर्णत: महादेव कोळयांचे आहे. अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्रायात १५६ गावे आदिवासी महादेव कोळयांची आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघातुन ते अनेक वेळा निवडून आलेले आहेत. गेली ४० वर्षे त्यांनी खऱ्या आदिवासींचे नेतृत्व केले आहे. सहयाद्रचा तो ढाण्या वाघ आहे. दुसऱ्यांची जात चोरुन घुसखोरी करणारे लबाड,ढोंगी कोल्हे हे गाढवाप्रमाणे वाघाचे कातडे पांघरुन वाघ होण्याचा प्रयत्न करतात. मोराने आपला पिसारा फुलवून लोकांना आकर्षित केले तरी त्याचा पार्श्वभाग उघडा पडतो हे त्याच्या लक्षात येत नाही तसेच दुसऱ्यांची जात चोरणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. कारण मधुकर पिचड यांनी जातपडताळणी अधिनियम,२००१ अस्तीत्वात आणला म्हणून आता बनावट दाखले घेतले तरी वैधता प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून त्यांच्या नावाने बोंबा मारल्या जात आहेत. म्हणतात ना चोराच्या उलटया बोंबा . तरी अशा ख्रोटया आणि दिशाहीन कोणतेही पुरावे न देता बोंबा मारु नयेत. असे बोंबा मारणारे त्यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयातही गेले होते परंतु ते तोंडघशी पडलेले आहेत. काजव्याचा पार्श्वभाग चमकतो तसा प्रसार माध्यमांमध्ये आपले नाव चमकविण्याचा कोणाीही प्रयत्न करु नये.

Leave a Comment