भाजपने बनवले पंकजाला ढाल

bjp
मुंबई : एकेकाळी संघर्ष यात्रेद्वारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंडेंच्या कन्या आ. पंकजा मुंडे-पालवे यांनी संघर्ष यात्रा आयोजित केली आहे.

मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात वंजारी समाजासह ओबीसींची लक्षणीय संख्या असलेला हा समाज भाजपापासून दुरावतो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर भाजपाने मुंडे यांच्या कन्येला ढाल बनविल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत राज्यातील 21 जिल्ह्यांत आणि 79 विधानसभा मतदारसंघांतून जाणा-या या संघर्ष यात्रेची घोषणा पंकजा यांच्या उपस्थितीत केली.

Leave a Comment