निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंदा पथकावर गुन्हा दाखल

dahi-handi17
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील ओम साईराम गोविंदा मंडळाच्या अध्यक्षाविरोधात जोगेश्वरी येथील मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १२ वर्षाखालील बालगोविंदाचा पथकात समावेश केल्याबद्दल सोमवारी रात्री हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दहीहंडी उत्सवात जखमी गोविंदाचे प्रमाण पाहता जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सव सुरक्षित होण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यालयात गेले असता सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देशांचे पालन करत एक वर्षासाठी काही अटी शिथिल केल्या. त्यानुसार गोविंदा पथकांना परवानगी देताना १२ वर्षाखालील बालगोविंदाना दहीहंडीत थरांवर जाऊ न देण्याची समज देण्यात आली होती.

मात्र तरीही काही गोविंदा पथकांनी हे आदेश न जुमानता बाल गोविंदांचा पथकात समावेश केला. त्यामुळे आणखी काही गोविंदा पथकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment