ब्रिटन पोलिसांनी केली भूतावर केस

police
लंडन – एका भूताला पकडून त्याच्यावर न्यायालयात केस दाखल करण्याचा पराक्रम ब्रिटन पोलिसांनी केला आहे. या भूताला न्यायालयाने १५ महिन्यांचा तुरूंगवासही ठोठावला आहे आणि ७७०० रूपयांचा दंडही ठोठावला आहे.

या संबंधीची हकीकत अशी की पोर्ट स्माऊथ भागात असलेल्या सिमेंट्रीमध्ये एक भूत चित्रविचित्र आवाज काढून नागरिकांना भीती दाखवित असे. इतकेच नव्हे तर हे भूत फुटबॉल खेळत असे. या भूताने या सिमेंट्रीमधील अनेक कबरींचेही नुकसान केले होते. अखेर भूताच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी भूताविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना सुरवातीला कांही कळेनाच की शोधायचे काय आणि कसे?

मात्र अखेर पोलिसांनी या कबरस्तानावर बारीक नजर ठेवली तेव्हा त्यांनाही भीतीदायक आवाज काढणारे आणि फूटबॉल खेळणारे एक भूत आहे असे आढळले. मात्र घाबरून न जाता पोलिसांनी या भूताला पकडण्याचे ठरविले आणि तसे पकडलेही. तपासात हे भूत म्हणजे २४ वर्षाचा एक बेरोजगार तरूण असल्याचे आढळले. अँथनी स्टेलार्ड असे या तरूणाचे नाव. त्यानेही भूत बनून नागरिकांना खूप घाबरविल्याचे व कबरीस्तानात तोडफोड केल्याचे न्यायालयासमोर कबूल केले आणि अखेर भूताला शिक्षा ठोठावली गेली.

Leave a Comment