हिंदीचा वापर सहज-सोपा करा: नीता चौधरी

neeta-chaudhary
पुणे – हिंदी राजभाषा लोकांना समजेल, उमजेल अशा शब्दांमध्ये वापरली जावी. ती अधिकाधिक सोपी असावी. शेत्रीय भाषेतील प्रचलीत शब्दांचा वापरही याकरिता करायला हरकत नाही, अशी भावना गृहमंत्रालयाच्या राजभाषा सचिव नीता चौधरी यांनी आज पुण्यात व्यक्त केली.

पुणे नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या बैठकीचे आयोजन पुणे आकाशवाणी केंद्रात करण्यात आली होते. हिंदीमध्ये झालेल्या कार्याचा सहामाही आढावा घेण्यासाठी हि बैठक झाली.

याबैठकीमध्ये पुण्यातील केंद्र सरकारी कार्यालयांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. १४५ समिती सदस्य कार्यालयांपैकी सुमारे १०० कार्यालयांचे अधिकारी या बैठकीस हजार होते.

यावेळी नीता चौधरी यांनी औपचारिकता बाजूला ठेवत उपस्थितांशी प्रत्यक्ष संवाद साधला. चौधरी यांनी हिंदी भाषेच्या व्यावहारिक वापरातील अडचणी, तक्रारी व सूचना जाणून घेतल्या.

या बैठकीस पुणे नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कुमार यादव, निर्देशक हरेंद्र कुमार, C -DAC चे कार्यकारी निर्देशक हेमंत दरबारी, आकाशवाणी पुणे केंद्राचे उपमहा निर्देशक आशिष भटनागर व विनोद कुमार शर्मा यांनी संबोधित केले.

बैठकीमध्ये हिंदीमध्ये कार्यालयीन व्यवहार तसेच पत्रव्यवहार व्हावा व तो वाढवा यादृष्टीने काही सूचना सद्स्यांकडूनही करण्यात आल्या. ज्या इतर राज्यांमध्ये हिंदी मधून व्यवहार होतो अशा कार्यालयांकडून पत्रांचे प्रारूप घ्यावे, सध्या हिंदी भाषेचा वापर करावा, युनिकोड हिंदी वापरात आणावी, क्षेत्रीय भाषेतील प्रचलित शब्दांचाही आधार घेण्यास हरकत नाही, अशी मते बैठकीत व्यक्त करण्यात आली.

याशिवाय हिंदीचा वापर संगणकावर करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यशाळांचे आयोजन C -DAC तर्फे ऑगस्ट अखेरपर्यंत कराव्यात अशी सूचना नीता चौधरी यांनी केली.

C-DAC लवकरच ‘श्रुती लेखन’ हे नवे software सेवेत आणत आहे. यामुळे आपण बोललेली वाक्ये आपोआप लिखित स्वरुपात जतन होतील. ही एक मोठी उपलब्धी असेल.