प्रमुख स्थानकांवर आणि महत्त्वाच्या गाडयांध्ये वाय-फाय सुविधा पुरविण्याचा रेल्वेचा विचार

wifi
नवी दिल्ली – ए1 ” आणि “ए” गटातील स्थानकांमध्ये तसेच राजधानी/शताब्दी/दुरांतो सारख्या महत्त्वाच्या गाडयांमधील 50 डब्यांमध्ये वाय्-फाय् सुविधा पुरविण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. हावडा-नवी दिल्ली-हावडा राजधानी एक्सप्रेसच्या 3 डब्यांमध्ये पथदर्शी प्रकल्‍प म्हणून सुरु करण्यात आलेल्या वाय-फाय सुविधेच्या व्यतिरिक्त हा प्रस्ताव आहे.

पथदर्शी प्रकल्पासाठी पूर्व रेल्वेने 6.67 कोटी रुपये खर्च केले. राजधानी, शताब्दी सारख्या गाडयांच्या 50 डब्यांमधील वाय-फाय सुविधेसाठी 55 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षात या कामासाठी उत्तर रेल्वेला 1 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. स्थानकांमध्ये भारतीय रेल टेल
महामंडळ, इंटरनेट सेवा पुरवठादारांच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा पुरवणार आहे. यात रेल्वेची गुंतवणूक असणार नाही. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

Leave a Comment