
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक स्क्वॉशने मिळवून असून दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनाप्पा या जोडीने स्क्वॉशमधून इतिहास घडवला आहे.
स्क्वॉशने भारताला दिले ऐतिहासिक सुवर्ण
जेनी डंकाफ आणि लौरा मॅसॅरो या इंग्लंडच्या जोडीला महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत या जोडीने ११-६, ११-८ धूळ चारत सुवर्णपदक पटकवले. स्क्वॉशमधून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक ठरले. विजयात दीपिकाच्या सर्व्हिस मोलाच्या ठरल्या.
