
नवी दिल्ली – सीबीआयने आज सिंडिकेट बँकेचा लाचखोर अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकासह इतर पाच जणांना आज अटक केली आहे. या व्यवस्थापकावर ५० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
लाचखोर व्यवस्थापकीय संचालकास अटक
व्यवस्थापकीय संचालक एस. के. जैन याने एका कंपनीची पत वाढवण्यासाठी नियमांना डावळून एका कंपनीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. जैन याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकरणी सीबीआयने नजर ठेवली होती.
बंगळूरु येथून जैन याला अटक करण्यात असून त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर पाच जणांमध्ये जैन याचा मेव्हणा आणि एका ‘सीए’चाही समावेश आहे.
